“महापालिका हद्दीत पनवेलची स्वतःची तपासणी लॅब असावी”

पनवेल दि.27: भाजपचे माजी खासदार तथा सनदी लेखापाल किरीट सोमैय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज एमजीएम कामोठे रुग्णालय, इंडिया बुल आणि महापालिकेला भेट देऊन रुग्णांवर सुरु असलेल्या उपचारासंदर्भात चर्चा करून व्यवस्थेचा आढावा घेतला.
कोविड १९ संसर्ग असलेल्या रुग्णांवर कामोठे एमजीएम येथे उपचार सुरु आहेत त्याचबरोबर कोन गावाजवळील इंडिया बुल येथे क्वारंटाईन सेंटर आहे. या ठिकाणी माजी खासदार किरीट सोमैय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत महापौर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर भेट देऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली तसेच रुग्णांना औषधे, भोजन वेळेवर देण्याबरोबर रुग्णांची योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना यावेळी तेथील वैद्यकीय तज्ञ् व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबरीने या लोकप्रतिनिधींनी महापालिकेला भेट देऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात चर्चा केली. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोना संदर्भात रुग्ण तपासणीचा अहवाल येण्यास वेळ लागत आहे तसेच तेथील यंत्रणेवर भार पडत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीत पनवेलची स्वतःची तपासणी लॅब असावी, अशी सूचना किरीट सोमैया यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!