वीज वितरण कंपनीने स्वतःच्या सोयीने काम न करता जबाबदारीने काम करावे – -आमदार प्रशांत ठाकूर !
पनवेल दि.९: पनवेल तालुक्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी महावितरणतर्फे लोकशाही दिन साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याची योग्य प्रकारे अमलबजावणी व्हावी, असे निर्देश भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 8) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.
पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सतीश सरोदे व इतर अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल मनपा माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, समीर ठाकूर, अजय बहिरा, मुकीद काझी, हरेश केणी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नेत्रा पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रमोद भिंगारकर, भीमराव पोवार, ब्रिजेश पटेल उपस्थित होते.
वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वाढीव देयके, मीटर बदलताना घेतले जाणारे पैसे, कर्मचार्‍यांची उद्धट उत्तरे, वीज गेल्या नंतर फोन न उचलणे अशा विविध समस्यांच्या अनुषंगाने बैठकीत अनेकांनी तक्रारी केल्या. महावितरणच्या कार्यालयात सीसी टीव्ही बसवा म्हणजे कोण खोटे बोलते ते समजेल असे ही सुचवण्यात आले. माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी तर वीज गेल्यावर रात्री आम्ही नागरिकांबरोबर कार्यालयात जातो, तर कर्मचारी नसतात, पण तोडफोड होईल म्हणून पोलिसांना मात्र फोन करून बोलावून घेतात नाहीतर आम्ही त्यांना दाखवून दिले असते, असे बोलून दाखवले. अनेक सोसायटीमध्ये असलेल्या डीपीमुळे अपघात त्यांची जागा बदलण्याची मागणी करून ही बदलेल्या जात नाहीत आशा प्रकारच्या अनेक तक्रारींचा पाढा माजी नगरसेवक आणी नागरिकांनी वाचला.
अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपला फोन संबंधित कर्मचार्‍याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे सांगितले, पण टोल फ्री नंबरवर अनेक वेळा व्यस्त असतो. तुम्ही लाईनवर आहात, अशी टेप वाजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांनी किती वेळ वाट पाहायची ते सांगा. त्यासाठी काही तरी उपाययोजना करण्यास सुचवले. मीटर बदलण्यासाठी तो जळला असल्यासच 600 रुपये चार्ज घेतो. फॉल्टी असल्यास फुकट बदलून दिला जातो असे स्पष्ट केले. आमच्याकडे मीटर नसल्यास दोन दिवस डायरेक्ट सापळे दिला जातो. नंतर त्याचे सरासरी बिल घेतले जात असल्याचे सांगितले. केबलसाठी आम्ही ठेकेदार नेमले आहेत त्यांनी आमच्याकडे नसल्यास केबल पुरवायची असल्याचे ही त्यांनी सांगितले. वीज ग्राहकांच्या तक्रारी पाहून त्यांनी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन प्रत्येक विभागात सुरू करण्यात येऊन तक्रारीचे निवारण करण्यात येईल असे सांगितले.
एखाद्या व्यक्तीने आपल्या घरातच व्यवसाय सुरू केला असल्यास त्याला 300 युनिटपर्यंत घरगुती मीटर वापरता येईल. त्यापेक्षा जास्त युनिट पडत असल्यास त्याला व्यावसायिक मीटर घ्यावे लागेल. त्याचे लगेच मीटर काढून नेऊ नये, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

♦️टोल फ्री नंबरवर किती वेळ वाट पहावी याबाबत निश्चित कालावधी ठरववा. लोकशाही दिनी आलेल्या तक्रारीची नोंद करून किती सोडवल्या याची माहिती उपलब्ध करून द्यावी ज्या ठिकाणी जिल्हा नियोजनकडून आर्थिक मदत हवी असेल, तेथे मी त्यांना मदत करीन, पण वीज ग्राहकांना होणार मनस्ताप दूर करण्यासाठी वीज वितरण कंपनीने स्वतःच्या सोयीने काम न करता जबाबदारीने काम करावे. – आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!