रत्नागिरी दि.२० (सुनिल नलावडे) खेड तालूक्यातील लोटे औद्योगीक परिसरातिल घरडा केमिक्ल्स कारखान्या मध्ये रियाक्टरचा स्फोट होउन घडलेल्या भीषण दुर्घटनेत काहि कामगार होरपळले असुन त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले हि घटना सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. आगिमध्ये आणखि काही कामगार जखमी झाले असुन सुत्रांकडुन ३ कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र त्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्याच्या प्लॅन्ट नंबर ७ मध्ये सकाळी ८.३० वाजता रिऍक्टरमधील तापमान अचानक वाढल्याने रिऍक्टरचा स्फोट झाला आणि उसळलेल्या वाफसदृश आगीत प्लॅन्टमध्ये काम करणारे दोन कामगार जळून जागीच ठार झाले तर चार कामगार गंभीर जखमी झाले. दुर्घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ हालचाल करत जखमी कामगारांना मुंबई ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न केले. मात्र गंभीर जखमी असलेल्या आणखी दोन कामगारांना वाटेतच मृत्यूने गाठले.
घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन आग लागली असल्याचे कळताच लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंपनी व्यवस्थापनाने स्वतःच्या अग्निरोधक यंत्रणेने सुमारे दिड तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. जेव्हा ही दुर्घटना घडली ती वेळ सकाळच्या नाश्त्याची असल्याने प्लॅन्टमधील बरेचसे कामगार नाश्त्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती असे सांगण्यात येते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!