पनवेल दि.14: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडलतर्फे माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण 60 माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव अ‍ॅड. आशा भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, कामोठे सरचिटणीस भास्कर दांडेकर, सुशील शर्मा, उपाध्यक्ष मनीषा वणवे, वैशाली जगदाळे, महिला मोर्चा उपाध्यक्ष रश्मी भारद्वाज, सुनीता शर्मा, ललिता इनकर, दीपाली तिवारी, वनिता दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ता रवी गोवारी, उत्तराखंड प्रकोष्ठ संयोजक हरिपाल बिष्त आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष तेजस जाधव, आदित्य भगत, किरण जाधव, प्रवीण कोरडे, विकी टेकवडे, धीरज सिंग, अमित झावरे, सुरेंद्र हल्लीकर, अभिजित बौंदार्डे, निलेश पाटील यांनी यशस्वीपणे केले. याबद्दल माजी सैनिकांसह उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!