अलिबाग, दि.23: श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पुढील आवश्यक उपचाराकरिता नेण्यासाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या ॲम्बुलन्सचे आज पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून सुसज्ज अशी कार्डियाक ॲम्बुलन्स उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मधुकर ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भरणे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, दर्शन विचारे, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी हे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री तटकरे, खासदार सुनिल तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयाकरिता 108 ॲम्बुलन्स सेवा तसेच डिजिटल क्ष-किरण मशीन उपलब्ध करून देण्यात आले होते.