पनवेल,दि.15: भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभर अभियंता दिन साजरा करण्यात येतो. सर एम. विश्वेश्वरैया यांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्पांकरिता दिलेल्या योगदानामुळे 15 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन देशभर अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध विभागातील सर्व अभियंत्यांच्या उपस्थितीत ‘अभियंता दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, शहर अभियंता संजय जगताप, सहाय्यक संचालक नगरचनाकार ज्योती कवाडे , कार्यकारी अभियंता संजय कटेकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख विलास चव्हाण, विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील, उद्यानविभाग प्रमुख राजेश कर्डिले, प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे दिपक मडके, वरिष्ठ अभियंता विनायक जाने महापालिकेतील विविध विभागातील सर्व अभियंता उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, सहाय्यक संचालक नगरचनाकार ज्योती कवाडे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख विलास चव्हाण, विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांनी उपस्थित अभियंत्यांना मार्गदर्शन केले.

तसेच सिडको महामंडळाचे मुख्यालय असलेल्या सिडको भवन येथे आज अभियंता दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, के. एम. गोडबोले, मुख्य अभियंता (नवी मुंबई), सिडको,आर. बी. धायटकर, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), सिडको, एन. सी. बायस, अतिरिक्त मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), सिडको,पी. एम. सेवतकर, अधीक्षक अभियंता (पालघर व नगर रचना-1) सिडको तथा अध्यक्ष, सिडको, सिडको, फैयाज खान, व्यवस्थापक (कार्मिक), इंजिनिअर्स असोसिएशन, विनोद पाटील, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!