अलिबाग, दि.27: मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आणि सनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चाचणी यशस्वीपणे संपन्न झाली. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या उपक्रमाची व्यवहार्यता तपासण्यासाठी हा उपक्रम अभ्यास प्रकल्प म्हणून तीन महिन्यांच्या कालावधीकरिता माथेरानमध्ये राबविण्यात येणार आहे.
यावेळी 06 स्वारस्य अभिरुची (EOI) पैकी 05 ई-रिक्षा या चाचणीत सहभागी झाल्या होत्या. पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माने, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कराळे व पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चे प्रादेशिक अधिकारी वि.वि. किल्लेदार, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी कामत, माथेरान नगरपरिषदेचे अधीक्षक दीक्षांत देशपांडे, माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) उमेश जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही चाचणी पूर्ण करण्यात आली.
या परिक्षण समितीच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे या अध्यक्ष असून सदस्य म्हणून कर्जत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, माथेरान नगरपरिषदेचे अधीक्षक, माथेरान सहायक पोलीस निरीक्षक, माथेरान-नेरळचे परिक्षेत्र वन अधिकारी तर माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे या सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. ही ई-रिक्षा चाचणी परिक्षण समिती अभ्यासपूर्वक याबाबतचा तांत्रिक अहवाल तयार करणार असून हा अहवाल रायगड जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव माथेरान संनियंत्रण समिती डॉ.महेंद्र कल्याणकर यांना सादर करण्यात येईल.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!