देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान
मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत मुर्मू यांना मिळाली ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते

नवी दिल्ली दि.२१: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत ७१९ खासदारांसह देशभरातील ४ हजारांहून अधिक आमदारांनी मतदान केले होते. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या २४ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!