पनवेल दि.१०: अर्थ अशासकीय संस्थेच्यावतीने पनवेलच्या ओरियन मॉलमध्ये स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करणारी “मर्द को भी दर्द होता है” हि सामाजिक आशयाची नाटिका सादर करून जनजागृती केली. या केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. शॉपिंगसाठी आलेल्या नागरिकांनी थांबून सादरीकरणाचा आनंद घेतला.
या नाटिकेचे यशस्वी आयोजन संस्थापक अध्यक्ष प्रवीण कलमे यांच्यासोबत संस्थेच्या सी ई ओ प्रविणा कलमे, ग्लोबल ॲम्बेसेडर प्रथम कलमे, सी एम ओ हेतल वाघ, सदस्य कृषीका शिरिशकर, इव्हेंट मॅनेजर विलास भोसले यांनी अथक परिश्रम घेतले.
अर्थ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कलमे यावेळी बोलतांना अर्थ हि एनजीओ संस्था आहे तिची स्थापना 2015 साली आहे. शासनाबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवले असून त्यामध्ये पोलीस मित्र महाराष्ट्र ऍप, प्लास्टिक जनजागृती, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, याचबरोबर कोरोना काळामध्ये कोरोना योद्धाना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. तसेच कोरोनाकाळामध्ये रूग्नसेवा योग्य दरात उपलब्ध होत नव्हत्या तेव्हा आम्ही एनजीओ मार्फत न्यायालयात धाव घेतली आणि त्यानुसार केंद्र सरकारने रुग्णवाहिका यांचे दर निश्चित केले असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असल्याचे सांगितले.
मर्द को भी दर्द होता है या नाटीकेद्वारे अर्थ संस्थेच्यावतीने सामाजिक संदेश देत एकविसाव्या शतकात स्त्री आणि पुरुष समानतेने काम करत आहेत,एकत्र येऊन काम करत आहेत अजूनही काही ठिकाणी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि ही मानसिकता बदलण्याची सुरुवात आम्ही करत असल्याचे अर्थ संस्थेचे संचालक प्रवीण कलमे यांनी बोलताना सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!