पनवेल दि.२१ (हरेश साठे) कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागु करण्याचे आवाहन केले असून कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, तसेच सर्वानी मनात भीती न बाळगू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
चीन मधून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आणि अनेक देशात तो पसरला. आपला देशही त्याला अपवाद राहीलेला नाही. केंद्र आणि राज्यशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे नागरीकांना सजग केले जात आहे. तसेच त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. नागरीकांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तथापि,आता ३१ मार्च पर्यंत कठोर निर्बध घालण्यात आले आहेत. त्याचे पालन करतानाच सुट्टीचा दिवस म्हणून अकारण गर्दी वाढू नये यासाठी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला प्रतिसाद मिळावा यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तीगत पातळीवर त्याचे समर्थन करण्यात आले आहे.काही नागरीकांनी तर सोशल मिडीयावर समर्थन करताना मी शपथ घेतो की असे नमूद करुन मी व माझे कुटूंबिय रविवारी (दि.२२) चौदा तास जनता कर्फ्यूचे पालन करेल असे नमुद केले आहे. जनता कर्फ्यु पाळून सायंकाळी ५ वाजता आपल्यावर आलेल्या संकटात मदत करणाऱ्या आरोग्य विभाग, पोलीस तसेच सरकारी अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर यामध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिंनदन आपण सर्वांनी आपल्या दरवाजात, बाल्कनीत किंवा गॅलरीमध्ये उभे राहून टाळ्या, ताट किंवा एखादे वाद्य वाजवून करायचे आहे. कोरोना व्हायरसला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात असताना एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने घाबरून न जाता आरोग्याची काळजी घ्यावी, आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला उत्फुर्त प्रतिसाद द्यावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!