पनवेल दि.20: पनवेल मध्ये आज तीन कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले असून विशेष म्हणजे तीन पैकी दोन रुग्णांमध्ये डॉक्टरांचा समावेश आहे.
या दोन डॉक्टरांमध्ये खारघर मधील ५४ वर्षीय डॉक्टर आहेत तर दुसरे डॉक्टर खांदा कॉलनी येथील अष्टविनायक हॉस्पिटल मधील आहेत.
खारघर मधील कोरोनाची लागण झालेले डॉक्टर शिवडी मुंबई याठिकाणी कार्यरत होते.
खांदा कॉलनी मधील डॉक्टरांच्या संपर्कात आलेला हॉस्पिटल मधील रुग्णाला देखील संसर्ग झाल्याने शहरात आज नव्याने तीन रुग्नांची नोंद झाली आहे.