स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल
पनवेल दि.०२: रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्यावतीने शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल ‘दिवाळी पहाट’ या सुमधूर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात असे दिवाळी पहाटचे एक अनोखे नाते आहे. मराठी-हिंदी भावस्पर्शी गाण्यांनी दिवाळीची पहाट सुरेल करण्याची परंपरा जपायला मराठी रसिकांना आवडते. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरतो. त्या अनुषंगाने सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. दिवाळी पहाटचे हे पाचवे वर्ष आहे. दर्जेदार कार्यक्रम तसेच उत्तम नियोजनामुळे सदरच्या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची गर्दी होत असते, त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रवेशिका आवश्यक अनिवार्य असून प्रवेशिका नि:शुल्क आहे. अधिक माहिती व निःशुल्क प्रवेशिकांसाठी चिन्मय समेळ (८७६७१४९२०३), अभिषेक भोपी (९८२०७०२०४३), रोहित जगताप (८६९१९३०७०९), गौरव कांडपिळे (९९२०८६८००८), आकाश डोंगरे (९९३०३१९८३२) किंवा सिद्धार्थ मोहिते (८८७९२१६६६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पनवेल शहरात वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाने पनवेलच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. आणि हा दिवाळी पहाट कार्यक्रम त्या ठिकाणी प्रथमच होत असल्याने रसिकांच्या मनात कार्यक्रमाची उत्सुकता भरली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!