पनवेल दि.२३: येत्या १८ डिसेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या उरण तालुक्यात १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे संकेत रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिले.
आज उरण तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हे संकेत देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, प्रदेश सदस्य डॉ. मनिष पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जेष्ठ नेते महेंद्र ठाकूर, कमलाकर घरत, भालचंद्र घरत, दिपक ठाकूर, लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, श्रेयश घरत, विनोद पाटील, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.