अलिबाग दि.18: संपूर्ण राज्यात शासनाकडून सामान्य जनतेसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे व त्यांच्या इतर आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून जिल्हा प्रशासन ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवित आहे.

   जिल्ह्यात ज्या केंद्रावरुन लसीकरण मोहीम राबविली जात आहे, त्या केंद्रांची माहिती पुढीलप्रमाणे:-
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग (2 केंद्र), उप जिल्हा रुग्णालय पेण, माणगाव, कर्जत,श्रीवर्धन (2 केंद्र), रोहा,  ग्रामीण रुग्णालय उरण, महाड, पोलादपूर, मुरुड, म्हसळा, चौक,  जेएनपीटी उरण, आर सी एफ हॉस्पिटल अलिबाग, खोपोली नगर परिषद, लायन्स हेल्थ क्लब अलिबाग.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील पेण- वाशी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र, गडब प्राथमिक आरोग्य केंद्र, जिते प्राथमिक आरोग्य केंद्र. पनवेल- नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र, वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्र, आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्र, गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र, आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र. कर्जत- कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहीली प्राथमिक आरोग्य केंद्र,कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र. म्हसळा- मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्र. रोहा- नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र,कोकबन प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेवाडी. श्रीवर्धन- बोर्लिपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्र, वाळवटी प्राथमिक आरोग्य केंद्र. माणगाव- इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, साई प्राथमिक आरोग्य केंद्र. खालापूर- खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्र. महाड- दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र,चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्र. सुधागड-जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली प्राथमिक आरोग्य केंद्र. तळा- तळा प्राथमिक आरोग्य केंद्र.  उरण- कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र. पोलादपूर- पित्तळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र. मुरुड- बोर्लीमांडला प्राथमिक आरोग्य केंद्र. अलिबाग- धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्र,पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्र, रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र.
याशिवाय पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील एम.जी.एम मेडिकल कॉलेज- कामोठे, येरळा मेडिकल ट्रस्ट मेडिकल कॉलेज-खारघर, टाटा हॉस्पिटल- खारघर, लाईफ लाईन हॉस्पिटल (शासकीय)-पनवेल, सुअस्थ हॉस्पिटल (प.म.न.पा.)-पनवेल, पनवेल हॉस्पिटल, श्री साई हॉस्पिटल, उन्नती हॉस्पिटल, एम.जी.एम. मेडिकल कॉलेज कळंबोली, लाईफलाईन हॉस्पिटल (खाजगी)-पनवेल, बिरमोळे हॉस्पिटल-पनवेल, पटवर्धन हॉस्पिटल-पनवेल, श्री सिद्धिविनायक, उपजिल्हा रुग्णालय-पनवेल, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1, 4-कळंबोली, 5-खारघर, 6-कामोठे, सुअस्थ हॉस्पिटल (खाजगी)- पनवेल.
तसेच व्यंकटेश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल- तळोजा, दांडेकर हॉस्पिटल व अतिदक्षता विभाग- खारघर, कॅलाड्रिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल- देवीचापाडा, सत्यम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल- कळंबोली, रिलायन्स इंडस्ट्रीज, लोधिवली ता.खालापूर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड फॅमिली वेल्फेअर हॉस्पिटल -नागोठणे,तालुका रोहा, संपूर्ण रेगे हॉस्पिटल- रसायनी, तालुका खालापूर, आदित्य नर्सिंग होम-तालुका महाड, या खाजगी रुग्णालयांमधून लसीकरण मोहीम सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!