केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची उपस्थिती
पनवेल दि.२६ : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त जागांवर निवड केलेल्या उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल नवी मुंबई क्षेत्रातर्फे आज पनवेल येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले, तर मेळाव्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवकांसोबत संवाद साधला.
देशभरात ४६ ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नांदेड आणि पनवेल अशा चार ठिकाणी तो झाला. पनवेल येथील मेळाव्यास खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, शिवसनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्माणासाठी सर्वांनी योगदान द्यावे आणि अमृत काळामध्ये देशाला विकसित बनवावे, असे आवाहन येथे केले. या मेळाव्यात नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, पालघर परिसरातील 356 यशस्वी उमेदवारांना नियुक्तपत्राचे वाटप करण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!