अलिबाग,दि.2: हे वर्ष भारतीय स्वातंत्र्यदिनाचे अमृत महोत्सवी वर्ष “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” म्हणून साजरे करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर “शेतकऱ्यांना मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 वाटप” या उपक्रमाचा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज श्रीवर्धन येथे शुभारंभ झाला.
यावेळी श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, दर्शन विचारे, मोहम्मद मेमन, नगराध्यक्ष फैसल हुरजूक, पंचायत समिती सदस्य मंगेश कोबनाक व इतर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
याचबरोबर मौजे भरडखोल येथील शेतकऱ्यांनाही मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 वाटप करण्यात आले.
अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील आजिवली येथे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 वाटप करण्यात आले.
महाड तालुक्यातील दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या मौजे तळीये येथे उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या उपस्थितीत येथील शेतकऱ्यांना मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 वाटप करण्यात आले.
उरण तालुक्यात नायब तहसिलदार पेडवी यांच्या हस्ते मौजे पाले येथील शेतकऱ्यांना मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 वाटप हा उपक्रम संपन्न झाला.
कर्जत तालुक्यातील तिघार या गावातील ग्रामस्थांनाही मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 वाटप करण्यात आले.
यावेळी संबंधित प्रांत, तहसिल, पंचायत समिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!