पनवेल,दि.28 : आजपासून शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील नवीन कोरोना रूग्णांचे गृहविलगीकरण (होमआयसोलेशन) न करता त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत इंडिया बुल्स या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे.
याआधी कोरोनाच्या सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांचे गृहविलगीकरण केले जात होते परंतू शासन आदेशानूसार कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवीन कोरोना रूग्णांना  गृहविलगीकरण करण्याऐवजी क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. यानूसार पनवेल महानगरपालिकेने इंडिया बुल्स येथे आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा वाढविल्या आहेत. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाकडून आवश्यक डॉक्टर्स, नर्स, औषधे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आजपासून वैद्यकिय आरोग्य विभागाच्या ट्रेसिंग टीम, मोबाईल टीम मधील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी ,शिक्षक यामार्फत रुग्णांना इंडिया बुल्स येथे संदर्भित करण्याची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी निर्गमित केले आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!