पनवेल दि.७: पनवेलसह रायगड मधील सुप्रसिद्ध अश्या ओरायन मॉल मध्ये यंदाची दिवाळी ग्राहकांनी देशाच्या अमृत महोत्सव निमित्ताने व कोविड बंधन मुक्त दिवाळी म्हणून मोठ्या प्रमाणात विविध खरेदी करून साजरी केल्याचा आनंद आज येथे जमलेल्या लकी ड्रॉ मधील तिकिटावरून दिसून येत असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेते सचिन खेडेकर यांनी आज पनवेल शहरातील ओरायन मॉल येथे आयोजित शॉप ऍण्ड व्हील लकी ड्रॉ अंतर्गत यशस्वी विजेत्यांचे नाव काढताना त्यांनी केले .
यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, दिलीप करेलिया, सुप्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते . यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते सचिन खेडेकर यांनी ओरायन मॉल मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध वर्ष भरातील उपक्रमाचे कौतुक करून , कोरोना कालावधी मध्ये या मॉलमध्ये काम करणाऱ्या एकाही कामगाराला कामावरून काढण्यात आले नाही उलट त्यांना असलेला पगार वेळच्या वेळी देण्यात आला .त्या बद्दल त्यांनी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कॊतुक केले. यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये पनवेलची अनुराधा पाटील ही सिंगापूर ट्रिप विजेती ठरली तर मानस धुरी राहणार मीरा रोड हे द्वितीय व ओम प्रकाश सिंग राहणार पलावे तृतीय बक्षीस ग्राहक विजेते ठरले आहेत .