अलिबाग,दि.15:-पनवेल तालुक्यातील खारघर खाडी भागात आज अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव आणि पनवेल उपविभागीय अधिकारी, राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांच्यासह मंडळ अधिकारी सुनील पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली.
या कारवाईत या पथकाने दोन बोटी व वाळूचे हौद नष्ट केले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांनी दिली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!