जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली कोविशिल्ड लस
अलिबाग, दि.9 : जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, जिल्हा खनिकर्म अधिकारी मेश्राम यांनी येथील जिल्हा रूग्णालयातील विशेष लसीकरण कक्षात आज “काेविशिल्ड” लस घेतली. आजपासून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या “काेविशिल्ड” लसीकरणास प्रारंभ झाला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ,प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ,गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तांभाळे, डॉ.दिपाली राजपूत, डॉ.अमोल खरात, अधिसेविका जयश्री मोरे, सहाय्यक अधीक्षक सिद्धार्थ चौरे, सार्वजनिक आरोग्य सेविका उषा वावरे, अधिपरिचारिका नम्रता नागले व इतर आराेग्य कर्मचारी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!