अलिबाग दि.18: जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीत काल अलिबाग जिल्हा कारागृहातील एकूण 25 पुरुष व एक महिला बंदी असे एकूण 26 बंद्यांचे कोविड-19 प्रतिबंध लसीकरण संपन्न झाले. त्याचबरोबर या बंद्यांची रक्तदाब, रक्त, मधुमेह, ताप तपासणी अशा प्रकारे संपूर्ण आरोग्य तपासणीही करण्यात आली.
याप्रसंगी अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक हरिश्चंद्र श्रीरंग जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, डॉ.श्वेता दिग्विजय कार्वेकर, विनोद ठाकूर, रुता अशोक पाटील, गौरी महेश तोते, किरण तुकाराम सालेकर,भागवत नामदेव वीर, अशोक नथुराम तांडेल, अशोक काशिराम चौधरी, विनोद रघुनाथ पाटील, भूषण बाळासाहेब गिते, सोमनिंग कटेप्पा कांबळे, मनोहर दत्तू बोंबले, संजय हरिभाऊ गावंड, कोमल सुरेश चिलप, जगदीश राऊत यांची उपस्थिती होती.