पनवेल दि. २०: राज्यातील काही भागात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसू लागल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रूपयांचा दंड आकारण्याचे आदेश प्रभाग समिती अधिकार्यांना दिले आहेत. त्यानुसार काल (दि.१९) मनपा क्षेत्रातील खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे भागातून एकुण ८७५०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.
काल (दि.१९) विनामास्क कारवाई
प्रभाग समिती ‘अ’ – १०५०० रुपये
प्रभाग समिती ‘ब’ – ३०००० रूपये
प्रभाग समिती ‘क’ -३२००० रुपये
प्रभाग समिती ‘ड’ – १५००० रुपये
एकुण दंड रु ८७,०००/ रुपये
मास्कचा योग्यरित्या उपयोग न करणार्या तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱया नागरिकांवर कारवाई करण्यासाठी आदेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी दिले आहेत. विना मास्क फिरणाऱयांवर जरब बसवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने चारही प्रभागात सध्या होत असलेली कारवाई वाढविण्यात आली आहे .
आज (दि.20) विनामास्क कारवाई
प्रभाग अ-खारघर – २१५००/
प्रभाग ब- कळंबोली – १५०००/
प्रभाग क-कामोठे- २००००/
प्रभाग ड-पनवेल- १०५००/
एकुण दंड रु ६७,०००/ रुपये