पनवेल दि.०१: आज १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन… सद्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे गेले अनेक दिवस घरात राहिल्याने नकारात्मकतेमध्ये वाढ झाली आहे, पण याही काळात आदर्श समूहाने आपली सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी ध्यानात घेऊन आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी व सकारात्मक दृष्टिकोन आणि कोरोना संदर्भात जाणीवजागृती करण्यासाठी आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालय व य.च.म.मु. विद्यापीठ (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आज ०१ मे रोजी सकाळी ११.०० वाजता ८७ DSM च्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत online कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते, य.च.म.मु. विद्यापीठ, नाशिक चे कुलगुरू डॉ.वायुनंदन सर, कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे, डॉ.सुभाष सोनुने, डॉ.वामन नाकले, डॉ.नरेंद्र जोशी, डॉ.टी. के.सोनवणे, श्रीम.रागिणी पाटील, श्रीम.जान्हवी खरमासे, हेमंत जगताप (कार्यकारी अभियंता) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला…
यामध्ये प्रथम ‘महाराष्ट्राला मानाचा मुजरा’ ही चित्रफीत दाखविण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली… चंद्रकांत म्हात्रे यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या नंतर डॉ.वामन नाकले यांनी सर्वांना कोरोना विरुद्ध कसे लढावे या संदर्भात मार्गदर्शन केले… य.च.म.मु. विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.वायुनंदन सर यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य करत या संकटातून कसे बाहेर पडता येईल व या समस्येतून संधी कशा मिळतील हे सांगत सर्वांना नवी दिशा व सकारात्मक दृष्टी दिली. यानंतर जाणीवजागृती साठीच्या Online Quiz चे उदघाटन धनराजजी विसपुते व मा.डॉ.वायुनंदन सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले… आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात धनराजजी विसपुते यांनी सद्यपरिस्थिती आणि आपली भूमिका यावर भाष्य करत ‘समस्येतून संधी निर्माण होतात’ हे सांगत अनेक कवाडे उलगडून दाखवलीत… या नंतर कोरोना संदर्भात जनजागृती करणारी एक चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली… महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली…
या आगळ्यावेगळ्या ऑनलाइन कार्यक्रमामुळे आदर्श शैक्षणिक समूहाच्या बी.एड्. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला.
