आज सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा १५८, पनवेल ग्रामीण ३८, उरण २९, खालापूर ४६, कर्जत १२, पेन ५६, अलिबाग ३४, मुरुड ९, माणगांव ९, रोहा १९, सुधागड ४, श्रीवर्धन १, म्हसळा २, महाड ४३, पोलादपूर ४ असे एकूण ४६४ रुग्ण सापडले आहेत.

आज पनवेल मनपा ६, महाड २ तर पनवेल ग्रामीण, उरण आणि खालापूरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण दगावले असून आज एकूण ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या ३३४ वर पोहोचली आहे.

आज आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे तब्बल ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा १६१, पनवेल ग्रामीण ८१, उरण १७, खालापूर ३८, कर्जत १, पेन ११३, अलिबाग ६३, माणगाव ६, रोहा ८, सुधागड १, श्रीवर्धन १२, महाड ११ या परिसरातील रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

रायगड जिल्ह्यात सध्या ३६६३ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत ८४७२ जणांनी जिल्ह्यात कोरोनावर मात केली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!