पनवेल दि.5 : रायगड जिल्ह्यात रविवार 5 जुलै रोजी 262 नवीन रुग्ण सापडले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 131 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात 145 पनवेल ग्रामीण मध्ये 39, उरण 23, खालापूर 10, रोहा 10, पेण 9, श्रीवर्धन 7, कर्जत 6, अलिबाग 6, माणगाव 4, महाड 2 आणि सुधागड मध्ये एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोंनाच्या रुग्णांची एकूण संख्या 5335 झाली असून जिल्ह्यात 154 जणांचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यात रविवार पर्यंत 19806 टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी 5335 पॉझिटिव्ह आल्या आहेत 193 टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर 2905 जणांनी मात केली असून 2276 रुग्णावर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात 154 जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.
 पनवेल महापालिका क्षेत्रात आज 145 नवीन रुग्ण सापडले. आज कळंबोलीत 12 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 470  झाली आहे. कामोठे मध्ये 22 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या 679 झाली आहे. खारघर मध्ये 25 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 575 झाली आहे. नवीन पनवेल मध्ये 34 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 459 झाली आहे. पनवेल मध्ये 41 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 550 झाली आहे.   तळोजा मध्ये 11 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 125 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 2858 रुग्ण झाले असून 1629 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57.00 टक्के आहे. 1146 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.      
पनवेल ग्रामीण मध्ये आज 39 नवीन रुग्ण सापडले त्यामध्ये गव्हाण 9, विचुंबे 5, दिघाटी 4, उलवे 3, वाजे 3, आदई 2, देवद, उसर्ली, सुकापूर, शिवकर, खानवळे , करंजाडे , कानपोली , डेरवली , भोकरपाडा , बारवई, बंबावी , आकूर्ली आणि आजीवली येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे . आज 39 रुग्णाणी कोरोंनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!