पनवेल दि.17: गेल्या दोन दिवसात स्थिर असलेल्या पनवेलमध्ये आज तक्का ३, कामोठे १, काळुंद्रे १ तर जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील एकासह आता सहा नव्या रूग्णांची भर पडली आहे.
तक्का येथील एका सरकारी धान्य दुकानदारासह ओला चालकाच्या संपर्कातील अन्य दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काळुंद्रे येथील औषधांच्या दुकानाचा प्रतिनिधी असलेली व्यक्ती भांडूप परिसरात ये- करीत असल्याने त्यालाही संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय कामोठे येथील सेक्टर ३४ मधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील एका व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून सदरची व्यक्ती मुंबईतील वरळी येथून श्रीवर्धनच्या ग्रामीण भागात गेली होती. पनवेल येथे उपचार घेत असलेल्या कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा ३८ वर गेला आहे.