पनवेल दि.१२: पनवेल, उरण याठिकाणी रविवारी नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८ वर पोहचला आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ४तर उरण मध्ये २अशा सहा रुग्णांची कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे.
या नव्या रुग्णांमध्ये खारघर मधील दोन, कळंबोली व तळोजे मधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
चार रुग्ण वाढल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या २२ झाली आहे. तर रायगड जिल्ह्यातील उरण ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६ झाली आहे आहे..
पनवेल मध्ये अद्याप चाचणी केलेल्या ३२५ नागरिकांचे कोविड 19 टेस्ट करण्यात आली आहे . यापैकी २७० नागरिकांची टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत . विशेष म्हणजे पनवेल परिसरातील होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांची संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. १४ दिवसांचा होम कोरंटाईनचा कार्यकाळ सुमारे २८ दिवसांवर करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून त्यांनी २८ दिवस घरीच थांबावे असे अवाहन आयुक्त देशमुख यांनी केले आहे . कोरोना बाधित रुग्ण – २८ ( पनवेल २२ + रायगड ग्रामीण ६ ) खारघर – ६, कामोठे – ३, कळंबोली – १२, तळोजे – १, रायगड ग्रामीण – ६ अशी आकडेवारी आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!