पनवेल दि.25: पनवेलमध्ये आज ५ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद असून पाचही रूग्ण मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेत कार्यरत होते.
१) कामोठे येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती महाराष्ट्र पोलिस दलात काम करीत आहे. सदर व्यक्तीवर एम.जी.एम.रूग्णालय, कामोठे येथे उपचार सुरू आहेत. ही व्यक्ती दरोज कामोठे ते सी.एस.टी. असा बसप्रवास करीत होती.
सदर व्यक्तीला मुंबई येथील कामाच्या ठिकाणी अथवा प्रवासादरम्यान लागण झाल्याबाबत प्राथमिक अंदाज आहे. ही व्यक्ती अगोदरपासूनच कॅन्सर आजारावर उपचार घेत आहे.
२) कामोठे येथील ४४ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला व्ही.एन.देसाई जनरल हॉस्पीटल, सांताक्रुझ येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर हॉस्पीटलमधूनच त्या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. हया महिलेवर दिनाक १६/०४/२०२० पासून भाभा हॉस्पीटल, कुर्ला येथे उपचार सुरू आहेत.
३) कामोठे सेक्टर-३४ येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती ट्रॉम्बे म्युनिसिपल डिसपेन्सरी, मुंबई येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीस मुंबई येथील कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. हया व्यक्तीवर उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे उपचार सुरू आहेत.
४) कामोठे सेक्टर १५ येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती ई-टिव्ही भारत यामध्ये पत्रकार म्हणून काम करीत आहे. सदर व्यक्तीस मुंबई येथील कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सध्या ही व्यक्ती फर्म हॉटेल, गोरेगाव, मुंबई येथे दिनांक २० एप्रिल पासून विलगीकरण कक्षामध्ये आहे.
५) नविन पनवेल येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला सायन हॉस्पीटल, मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. सदर हॉस्पीटलमधूनच त्या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सदर महिलेवर सेवन हिल हॉस्पीटल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत.
डी.वाय.पाटील हॉस्पीटल, नेरूळ येथे उपचार घेत असलेल्या रूग्णाची कोव्हिड-१९ च्या अंतिम चाचण्या नेगेटीव्ह येऊन सदर रूग्ण कोरोना विषाणू संसर्गातून पुर्णपणे बरी झाली होती. परंतु सदर रूग्ण ह्रदय विकार व किडनी निकामी झाल्याने त्याचे दुख:द निधन झाले आहे.
सायन हॉस्पीटल, मुंबई येथे उपचार घेत असलेली १ व्यक्ती आज पुर्णपणे बरी होऊन सदर व्यक्तीला आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
