पनवेल दि.7: पनवेल तालुक्यात आज २३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून महापालिका क्षेत्रात १७ तर ग्रामीण भागात ६ नवे रूग्ण आढळले आहेत. महापालिका हद्दीतील कामोठ्यात ८, नवीन पनवेलमध्ये ३, पनवेलमध्ये ३, खारघरमध्ये २ तर कळंबोलीत १ नवीन रूग्ण आढळले असून ग्रामीण भागातील करंजाडे येथे ३ तर विचुंबे, उलवे, पालीदेवद येथे प्रत्येकी १-१ रूग्ण आढळले आहेत.
पनवेल शहर
कामोठे : ८
कामोठे सेक्टर-६, संगम सरीता सोसायटी मधील गंगा अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती याअगोदरच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला होता. त्याच्या संपर्कात येऊनच या तिघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-६ शितलधारा कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांच्या घरातील कुटुंब प्रमुख वडाळा बस डेपोमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत असून तो याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला होता. त्याच्या संपर्कात येऊनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-११ आशियाना कॉम्प्लेक्स येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती कॅन्सर आजारावर उपचार घेण्याकरीता वारंवार जैन हॉस्पीटल, चेंबुर येथे जात होती. सदर हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-११ येथील ५७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला मसीना हॉस्पीटल, भायखळा, मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-३५ संकल्प सोसायटी येथील २६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती धारावी, मुंबई येथे बेस्ट बस ड्रायव्हर असून ते याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात येऊनच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
नविन पनवेल : ३
नविन पनवेल सेक्टर-४ पुष्पमाला सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांच्या घरातील एक व्यक्ती APMC मार्केट, वाशी येथे कार्यरत असून तो याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला होता. त्याच्या संपर्कात येऊनच या दोघींना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
नविन पनवेल सेक्टर-१६, पोदी नं.२ येथील ५० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल : ३
पनवेल तुलसीधाम सोसायटी येथील ४९ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला मिनाताई ठाकरे हॉस्पीटल, नेरूळ येथे स्टाफनर्स म्हणून कार्यरत आहे. त्यांना हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल, प्लॉट नं.४५, परमेश्वरी निवास, ५२ बंगलो येथील ४८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही महिला NMMC हॉस्पीटलमध्ये स्टाफनर्स म्हणून कार्यरत आहे. त्यांना सदर हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल पारिजात सोसायटी, उरणनाका येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती TCS कंपनी, ठाणे येथे कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर : २
खारघर सेक्टर-३५ई जयानी बिल्डिंग येथील २५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेच्या कुटुंबातील तीन व्यक्ती याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांच्या संपर्कात येऊनच हया महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
खारघर घरकुल, सेक्टर-१५ येथील ५० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला किडनीच्या आजारावर उपचार घेण्याकरीता डी.वाय.हॉस्पीटल, नेरूळ येथे अगोदर पासूनच दाखल आहे. सदर हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कळंबोली : १
कळंबोली सेक्टर-३ई येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बेस्ट डेपो, गोवंडी येथे कन्डक्टर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल ग्रामीण
करंजाडे : ३
सविता बिल्डींगए प्लॉट ८३,सेक्टर आर-१, करंजाडे , येथील ४३ वर्षीय महिला कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. तसेच सदर महिलेच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.
आराध्या रेसिडेन्सी, प्लॉट २२ ब, सेक्टर १, करंजाडे येथील ५४ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आले आहेत. सदर व्यक्ती मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
मिथीली होम्स, प्लॉट १४०, सेक्टर ४, करंजाडे, येथील ३२ वर्षीय महिला कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर महिलेच पती हे याआधी कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदर महिलेस त्यांच्या पतीपासून संसर्ग झाल्याचा | प्राथमिक निष्कर्ष आहे.
विचुंबे :१
१०२, ई विंग, गंगा रिजेन्सी, विचुंबे येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती मातोश्री बंगला, मुंबई येथे कार्यरत आहे. सदर व्यक्तीस मातोश्री बंगल्याच्या बाजूचा चहावाला याच्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
उलवे : १
३०२, बी विंग,मोरेश्वर हौ.सोसा. सेक्टर ५, उलवे येथील ५७ वर्षीय महिला कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर महिला नेरूळ-१, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहे. सदर महिलेस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
सुकापूर : १
ओ विंग, बालाजी लाईफ स्टाईल, पालीदेवद, सुकापूर येथील ३५ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आले आहेत. सदर व्यक्ती मुंबई येथे पोलीस विभागत कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.