पनवेल दि.16 : पनवेल महापालिका हद्दीत आज १२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यात ७, खारघर २, कळंबोलीत २ तर तळोजामधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये आज ८ नवीन कोरोनाबधित रूग्णांची नोंद झाली असून यामध्ये कोन येथील ४ तसेच उलवे, पालीदेवद, करंजाडे, देवद येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

महापालिका हद्दीत आजचे नविन १२ रूग्ण
कामोठे: ७

कामोठे, सेक्टर-१०, मारूती एनक्लेव्ह येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती जे.एन.पी.टी., उरण येथे कार्यरत आहे.

कामोठे, सेक्टर-१, अनिवृध्द आस्था सोसायटी येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती निर्मल नगर पोलिस स्टेशन, वांद्रे येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-११, हरिओम आर्केड येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती ऑर्थररोड जेल, मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-१८, हरिओम कॉम्प्लेक्स येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीला टायफाईडचा त्रास असून ते उपचाराकामी हॉस्पीटलमध्ये जात होते. सदर हॉस्पीटलमध्येच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-५, स्टार ए-१ सोसायटी येथील ४२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती मुंबई महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-१६, सुरज सदन सोसायटी येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला नेरुळ येथील एका डायग्नोसिस सेंटरमध्ये तपासणीसाठी वारंवार जात होती. सदर ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-६, स्नेहल अपार्टमेंट येथील ४१ वर्षीय १व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती दादर बेस्टडेपो येथे बेस्ट ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

खारघर: २
खारघर, सेक्टर-३६, स्वप्नपुर्ती सोसायटी येथील ४८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती ऑर्थररोड जेल, मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

खारघर, सेक्टर-१५, घरकुल मातृछाया सोसायटी येथील ४१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती जीओ कंपनी, चेंबूर येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कळंबोली: २
कळंबोली, सेक्टर-रई, LIG-२ येथील ४४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती शिवाजी नगर, गोवंडी येथील बेस्ट डेपोमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कळंबोली, सेक्टर-३ई, के.एल.५ येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती आष्टे लॉजेस्टीक कंपनी, रसायनी रोड येथे कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

तळोजा: १
तळोजा, Rapid Action Force (RAF) कॅम्प येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीला अपेंडिक्सचा त्रास असल्यामुळे उपचाराकामी ते वारंवार हॉस्पीटला जात होते. त्यावेळीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


पनवेल ग्रामीणमध्ये आजचे नविन रुग्ण – 8
कोन: ४

कोन, रमेश घरत चाळ, ता.पनवेल येथील ३३ वर्षीय, ३७ वर्षीय, ३३ वर्षीय व ४० वर्षीय ०४ व्यक्ती कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेल्या आहेत. सदर व्यक्तींच्या कामाच्या व राहण्याच्या ठिकाणचा एक सदस्य हे याआधी कोविड-१९ पॉझिटीव्ह आले होते. सदर व्यक्तींना त्यांच्या कामाच्या व राहण्याच्या ठिकाणीच्या सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

उलवे: १
उलवे, निलसिदधी जोया, प्लॉट १८३, सेक्टर २०, ता. पनवेल येथील २१ वर्षीय ०१ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेले होते. सदर व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

पालीदेवद: १
पालीदेवद, सुकापूर, न्यू कार्तिक सोसा., ता.पनवेल येथील ३३ वर्षीय ०१ व्यक्ती कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती पनवेल येथे पोलीस विभागात कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

देवद: १
देवद, युनायटेड होम्स, ता. पनवेल येथील २९ वर्षीय ०१ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती चेंबूर, मुंबई येथे खाजगी मेडीकल दुकानात कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

करंजाडे: १
करंजाडे, शिवकृपा, सेक्टर ६, ता. पनवेल येथील ३९ वर्षीय ०१ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती परळ, मुंबई येथे खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2020/05/Screenshot_20200516-185339_Drive.jpg

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!