पनवेल दि.6: पनवेल तालुक्यात आज ११ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून महापालिका हद्दीत ६ तर उर्वरीत ग्रामीण भागात ५ नवे रूग्ण आढळून आले आहेत.

पनवेल पालिका क्षेत्र – ६
१) खारघर, सेक्टर-१०, कोपरा गाव येथील ४१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती APMC मार्केट, वाशी येथे टेम्पो ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

२) खारघर, सेक्टर-३५ई, जायनी सोसायटी येथील ४६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती व मुलगा याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

३) खारघर सेक्टर-१३ बालाजी हाईटस येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती डायलिसीस करीता सुरज हॉस्पीटल, सानपाडा येथे जात होती. सदर व्यक्तीला हॉस्पीटलमधूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

४) कामोठे, सेक्टर-१४, मिराप्रभु निवास येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बेस्ट डेपो, गोवंडी येथे बस ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

५) कामोठे, सेक्टर-२४, स्कायगोल्ड अपार्टमेंट येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती वडाळा पोलिस स्टेशन, मुंबई येथे PSI म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

६) कामोठे सेक्टर-१८ सिल्वर पार्क सोसायटी येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती APMC मार्केट, वाशी येथे असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. हया व्यक्तीचा कार्यालय प्रमुख याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आला होता.
त्यांच्या संपर्कात येऊनच हया व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

पनवेल ग्रामीण- ५

१) ए विंग, ओमकार पार्क ३, विचुंबे , येथील ३ वर्षीय बालक कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर बालिकेचे पालक हे याआधी कोविड-१९ झिटीव्ह आलेले आहेत. सदर बालिकेस त्यांच्या पालकापासन संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

२) डेल्टा टॉवर, प्लॉट १, अ-ब्लॉक, सेक्टर ८, डेल्टा टॉवर , येथील ३१ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती वॉचमन असून बिल्डींग क्र.१ मध्ये राहत असलेली १ व्यक्ती याआधी कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदर पॉझिटीव्ह व्यक्तीपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

३) डी विंग, पनवेल पॅराडाईज, आकुर्ली येथील ३५ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती जिल्हा व्यवस्थापक, बीव्हीजी, रूग्णवाहिका सेवा या कार्याशी संबंधीत कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

४) व्हिनस ऑर्चिड, सेक्टर ५, प्लॉट २२, उलवे येथील ३२ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आले आहेत. सदर व्यक्ती रूग्णवाहिका डॉक्टर मुंबई येथे कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

५) उरली खुर्द येथील ३० वर्षीय महिला कोविड-१९ पॉझिटीव्ह आले आहेत. सदर महिला मुंबई येथे सेवाभावी संस्थेमध्ये कार्यरत आहे. सदर महिलेस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!