पनवेल दि.१३: पनवेल महानगरपालिका हद्दीत एका ओला टॅक्सी चालकास कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल शहरातील या रुग्णामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णाची ही संख्या २३ वर पोचली आहे , तर पनवेल ग्रामीण आणि उरण मधील ६ रुग्ण मिळून ही संख्या २९ वर पोहोचली आहे.
पनवेल शहरात सापडलेला हा रुग्ण शहरातील इस्राळी तलावाजवळील आजरोजी निकी टॉवर येथे राहणारा असून तो व्यवसायाने ओला कॅब चालक आहे. हा चालक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मुंबई ते पनवेल प्रवाशी वाहतूक करत असे. त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याची कोरोनाची तपासणी केली असता पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!