वाशी दि.14(विठ्ठल ममताबादे) नवी मुंबई मधील आरोग्य सेवेतील प्रसिद्ध फोर्टिस हॉस्पिटल (हिरानंदानी हॉस्पिटल)मध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली. रांगोळी कला स्पर्धेतून कोरोना योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर,नर्स, हॉस्पिटल स्टाफ, पोलीस, सुरक्षा कर्मचारी, वाहतूक सेवेतील कर्मचारी आदींचे चित्र रेखाटून त्यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. 22 मार्च 2020 पासून कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लोकडाऊन करण्यात आले तेंव्हा पासून कोरोना रुग्णांना गुणवत्तापूर्ण तसेच वेळेत उत्तम सेवा देण्याचे काम हॉस्पिटलने केले आहे. आजपर्यंत अनेक कोरोना रुग्ण उत्तम उपचार घेऊन आनंदाने घरी परतले आहेत. आरोग्य सेवेतील फोर्टिस हॉस्पिटल उत्तम रुग्णालय म्हणून प्रसिद्ध आहे अश्या या रुग्णालयात बिलिंग डिपार्टमेंट मध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले.यावेळी फॅसिलिटी डायरेक्टर संदीप गुडूरु, HR-सुरेश चव्हाण, राजेश दुबे, विजय काळे, मटेरियल हेड -रवींद्र  पंधे, कॉर्पोरेट डिपार्टमेंट हेड – गोकुळ चौधरी ,रॅडिलॉलॉजी डिपार्टमेंटचे नितीन भामरी, बिलिंग डिपार्टमेंट हेड युनूस डिसोझा, कल्पना कलेटी, पेशन्ट एक्सप्रेरियन्स – संदीप कौर, नितीन कमारिया, ज्यूबी बोस आदी फोर्टिस हॉस्पिटलचे अधिकारी वर्ग तसेच बिलिंग डिपार्टमेंटचे कर्मचारी -प्रशांत सोनावणे, डॉ अर्चना गोरे, तन्मय घोष, उमेश पाटील, विठ्ठल ममताबादे, प्रकाश पाटील, रंजना पटेल, ऋतुजा अंबडोस्कर, किरण चौधरी, पूजा थापा, परशुराम कांबळे, चेतन चव्हाण, जितेंद्र नलावडे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. एकंदरीतच फोर्टिस हॉस्पिटल मध्ये लक्ष्मीपूजन उत्साहात संपन्न झाले. नागरिकांनी सोशल व फिजीकल डिस्टन्स ठेवून आपले सर्व व्यवहार करावेत. नेहमी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले सूचनांचे नागरिकांनी वेळोवेळी पालन करून आपले आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन फोर्टिस हॉस्पिटलने यावेळी  नागरिकांना केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!