उरण दि.१०: अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रेला दिनांक ९ ऑगस्ट रोजी जासई येथून सुरूवात करण्यात आली. जासई येथील हुतात्मा स्मारकास मानवंदना व स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करून जासई, चिर्ले, गावठाण, वेश्वी, दिघोडे, विंधणे, भोम ते चिरनेर येथे सन १९३० मधील हुतात्म्यांच्या स्मारकाजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. जवळ जवळ २० ते २२ किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये महिला व तरुणांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या पदयात्रेचे नेतृत्व रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले.
या पदयात्रेवेळी रायगड जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील, राजाभाऊ ठाकूर, मिलिंद पाडगांवकर, श्रद्धा ठाकूर, विनोद म्हात्रे, डॉ. मनिष पाटील, अखलाक शिलोत्री, किरीट पाटील, मार्तंड नाखवा, संजय ठाकूर, महेंद्र ठाकूर, रेखा घरत यांच्या सह शेकडोंच्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!