कोमसाप नवीन पनवेल शाखेचे कविसंमेलन
पनवेल दि.2 : सृजनशील मनाचा कवी हा समाजाला जोडणारा एक दुवा आहे ,असे मत पनवेल महानगरपालिकेचे गटनेते परेश ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाइन कवी संमेलनातील ‘मी पुस्तक बोलतोय’ या पाचव्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी केले .
नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या मी पुस्तक बोलतोय या उपक्रमाला सुप्रसिद्ध गझलकार रघुनाथ पोवार त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यापुढे बोलताना परेश ठाकूर यांनी, कोरोना महामारीच्या परिस्थितीत सकारात्मक दृष्टीने मदत करणारी ही संवेदनशील मंडळी समाजाला सुखद,आल्हाददायक अनुभव देत आहेत असे सांगितले.
प्रसिद्ध गझलकार रघुनाथ पोवार यांनी शुभेच्छा देताना,या उपक्रमात कवींनी पुस्तकाला बोलत केले.पुस्तकाला बोलते करणे ही सोपी गोष्ट नाही .एखाद्या कवीच पुस्तक हे अपत्य मानल जात .पुस्तक ही कवीची स्वंयनिर्मिती असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, पुस्तक म्हणजे कवीचे अंतर्मन असते. कवीचे पुस्तक म्हणजे भावना ,कल्पना,वास्तवता यांनी सजलेलं घर असतं .मनाचा कप्पा हलकं करून लिहिलेलं पुस्तक असते.
मी पुस्तक बोलतोय या उपक्रमात प्रा. चंद्रकांत मढवी यांनी उधळ्या( कादंबरी), ज्योत्स्ना रजपूत यांनी आभासऋतू (कवितासंग्रह), ॲड. छाया गोवारी यांनी देवदासीची पावले (कथासंग्रह),स्मिता गांधी यांनी माझ्या कविता(कवितासंग्रह),गणेश कोळी यांनी माझी पत्रकारिता या पुस्तकांचं मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विजय पवार यांनी, पुस्तकाचं भावविश्व कवींनी उलगडावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले .कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन योगिनी वैदू यांनी केले तर आभार मंदाकिनी हांडे यांनी मानले.
