पनवेल दि.०६: इंटरनॅशनल डान्स काउंसिल, सि. आय्. डी. फ्रान्स, पॅरिस या संस्थेच्या सभासद असलेल्या अखिल नटराजम् आंतर सांस्कृतिक संघ, नागपूर यांनी जगभरातील नृत्यांगनां करिता आयोजित केलेल्या ‘ऑनलार्इन इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट 2021’ या नृत्य स्पर्धेत सी. के. ठाकूर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनी कु. श्रावणी थळे (इ. 7 वी) कु. सर्इ जोशी (इ. 9 वी) आणि कु. प्रणिता वाघमारे (इ. 10वी) या विद्यार्थीनींनी आणि त्यांच्या इतर सहकारी नृत्यांगनांच्या समूहाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सी.के.टी. परिवाराकडून या विद्यार्थीनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘‘कोरोना काळातही नृत्याचा सराव सातत्याने करून या स्पर्धेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या या विद्यार्थीनींचा विद्यालयाला निश्चितच अभिमान वाटतो.’’ असे या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.
या सर्व विद्यार्थिंनीचे संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हार्इस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण सर, पर्यवेक्षक, शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांजकडून अभिनंदन केले.