पनवेल दि.२६: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) मधील पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आज समारंभपूर्वक पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल अ. पवार उपस्थित होते.
या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, रामशेठ ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. सी. मराठे आणि संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली. या प्रसंगी प्रभारी प्राचार्य मा. प्रो. डॉ. एस. के. पाटील आणि आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध विभागांचे प्रमुख मंचावर मान्यवरांसोबत उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी, विद्यार्थ्यांचे कोविड-१९ च्या कारकिर्दीतही उल्लेखनिय यश संपादन केल्याबद्दल कौतुक केले. हा दिवस शिक्षक आणि पालक यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केले. या संस्थेने विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी देखील मार्गदर्शन दिले असे संस्थेचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन असे सांगितले की, तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठे स्वप्न उराशी बाळगा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे सुद्धा कौतुक केले. त्यांनी असेही संबोधित केले की, नुसते पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसून या जगात वावरण्यासाठी सामान्य ज्ञानही महत्वाचे आहे, असा मौलिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र तसेच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ , सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!