पनवेल दि.13: कोरोना बाधित रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यासाठी करावी लागणारी धावपळ होऊ नये याकरीता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कोविड १९ रुग्णालयांमधील दररोजच्या उपलब्ध बेडबाबतची माहिती लिंकद्वारे नागरिकांना मिळणार आहे.
पनवेलकरांच्या सेवेसाठी सातत्याने तत्पर असलेले भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने तसेच पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांच्या मागणीला यश आले आहे.
या संदर्भात महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी केली होती. पनवेल महानगरपालिका व ग्रामीण भागात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाला दाखल करण्यासाठी ज्या हॉस्पिटलची निवड केलेली आहे. त्या कोविड सेंटरमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध आहे की नाही हे नागरिकांना व रूग्णांना समजण्याचे कोणतेही माध्यम नाही. माहिती उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असून सर्वत्र गोंधळ पसरला असून नागरिकांमध्ये संभमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासबंधीची माहिती रोजच्या रोज डॅशबोर्ड प्रसिद्धी केली तर रूग्णांना विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाही. इबोर्डबर माहिती प्रसिद्ध झाल्यास नागरिकांना कोविड सेंटरवी उपलब्धता व क्षमता कळेल व त्यामुळे कोरोना बाधीत रूग्णांना दाखल करण्यास अडचणी निर्माण होणार नाही. त्यामुळे कोरोनाची माहिती रोजच्यारोज प्रसिद्ध होण्याकरीता डॅशबोर्ड उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती.
या मागणीनुसार https://www.covidbedpanvel.in/
या संकेतस्थळावर हि माहिती उपलब्ध करण्यात आली असून यामध्ये नागरिकांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेली सर्व कोविड १९ रुग्णालयांची नावे व संपर्क क्रमांक तसेच संबंधित रुग्णालयातील एकूण बेड, अतिदक्षता विभाग (ICU) व साधारण विभागामध्ये उपलब्ध असलेले बेड यांची दररोजची तपशीलवार अद्ययावत माहिती देण्यात येणार आहे.