ठाणे दि.5: भाजपाच्या ठाणे शहरातील खोपट येथील कार्यालयाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काल रात्री भेट दिली. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात ठाणे शहराला प्रथमच एकनाथजी शिंदे यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री लाभला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीत ठाणे शहराचा आणखी वेगाने विकास होऊन, राज्यात ठाण्याच्या लौकिकात भर पडेल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने आमदार व भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे,भाजपा प्रदेश सरचिटणीस संदीप लेले, भाजपा गटनेते मनोहर डुंबरे,महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे,यांच्यासह माजी नगरसेवक सूनेश जोशी,माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील,स्नेहा रमेश आंब्रे यांच्यासह अनेक मान्यवर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!