पनवेल दि.२६: गोर गरीब व गरजू लोकांचा मोफत अंत्यविधी व अंत्यविधी साठी मोफत अॅम्बुलन्स सुविधा पुरविणाऱ्या अंत्यविधी सेवा संस्था पनवेल या संस्थेला सामाजिक जाणीव असणारे व नेहमीच गोर गरीबांना मदत करणारे कामगार नेते महेंद्रजी घरत यांनी ५१०००/-रूपयांची आर्थिक मदत केली. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री प्रदीप ठाकरे यांच्या कडे हि मदत संघटनेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते. अंत्यविधी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार नेते महेंद्र घरत यांचे यावेळी आभार मानले.