मुंबई दि.19: बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात रविवारी पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रविवारी तसेच सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार तर मराठवाडा व विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता असल्याने कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!