पनवेल दि.९: त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून पनवेल नगरीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात सोमवारी दि.७ रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संपूर्ण परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला.
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते, या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरी वात अर्थात दिव्यांची वात लावली जाते, हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो, हिंदु धर्मात अनन्य साधारण महत्त्व असलेली कार्तिक पौर्णिमा आहे या दिवशी गंगेत स्नान करण्याने मोठे पुण्य मिळते अशी भावना आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दिपोत्सवही साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराने अखंड भूमीवरून जनतेला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाचे तीन पुत्रांचा वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात, त्याचेच औचित्य साधून रामेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकरापुढे आरती व त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाटील व उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा मंदिराचे अध्यक्ष उमेश इनामदार आणि यांनी केले होते.
या दीपोत्सवाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी धोटे, दिनेश बागुल,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सोशल मीडियाचे प्रसाद हनुमंते, तसेच मंदिराचे विश्वस्त, कार्यकर्ते व भाविकगण उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!