पनवेल दि.११: राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत. याबद्दल भाजपच्या पनवेल शहर व तालुका मध्यवर्ती कार्यालयापाशी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पीयुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचूक व्युहरचना केली. याबद्दल पनवेलमध्ये भाजपकडून फटाके वाजवून, पेढे वाटून तसेच बॅण्डच्या तालावर नृत्य करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तथा कोकण प्रभारी गोविंद गुंजाळ, कोकण सहसंयोजक भास्कर यमघर, महिला सहसंयोजक उज्ज्वला गलंडे, उत्तर रायगड जिल्हा संयोजक बबन बारगजे, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष शैलेत काते, महिला जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, किसन पाटील, संजय जैन, प्रसाद हनुमंते, अनंत गुरव, हारुकाका भगत, राजू कोळी, शांताराम कोळी, मधुकर उरणकर, गोपीनाथ लोखंडे, गुलाब बागवान, रोहित आटवणे, चांगा भोईर, गणेश म्हात्रे, रघुनाथ बहिरा, विजय म्हात्रे, सुहासिनी केकाणे, केदार भगत, चेतन कांबळे, सुबोध ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकमेकांचे अभिनंदन केले.