अलिबाग,दि.2 : महसूल विभागामार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनोंच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील युवकांनी दुवा म्हणून काम करावे. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले.
पनवेल येथील सी.के.टी. महाविदयालय येथे महसूल सप्ताहा अंतर्गत ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ५ नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच सी. के. टी. कॉलेजमधील 10 विदयार्थ्यांची महसूल दुत म्हणून निवड करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, पनवेलचे तहसिलदार विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड करण्यात आलेल्या नवनियुक्त अधिका-यांनी स्पर्धा परीक्षाबाबत माहिती देवून युवकांशी संवाद साधला.तहसिलदार कार्यालय पनवेल मार्फत यावेळी नवमतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले व त्याठिकाणी २०० नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.
यावेळी महसूल विभागामार्फत वाटप करण्यात येणा-या विविध दाखल्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.
महसूल सप्ताहाच्या तीसऱ्या दिवशी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!