पनवेल दि.28: कुटुंबातील व्यक्तीच्या पुण्यतिथी निमित्त कोळखे येथील डॉ. विशाल पाटील व विश्वनाथ पाटील या दोन तरुणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
करोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने १ हजार रक्त बाटल्या संकलित करण्याचा मानस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. या अनुषंगाने युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात नियोजन करण्यात येत आहे.
भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्या मातोश्री अनुसया हरिचंद्र पाटील यांच्या १३ व्या पुण्यतिथीला त्यांच्या कुटुंबातील डॉ. विशाल पाटील आणि विश्वनाथ पाटील या युवकांनी पुण्यतिथीदिनाच्या पूर्वसंध्येला रक्तदान करून आदर्शवत काम केले आहे. यावेळी युवा नेते आनंद ढवळे, रोहित घरत आणि रेहान पाटील उपस्थित होते.