पनवेल दि.२४: महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे महाविकास आघाडी सरकार अद्यापही निद्रास्थ अवस्थेत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले असून या निष्क्रिय कारभाराचा आज पनवेलमध्ये उपोषण करून जाहीर निषेध करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित केले त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही याचा जाब या आंदोलनातून सरकारला विचारण्यात आला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची राजकीय हत्या करून ओबीसी समाजास दडपण्याचे षडयंत्र रचले आहे. त्या निषेधार्थ तसेच मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारला लोकशाही मार्गाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखालीे तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप ओबीसी मोर्चातर्फे दि.२३ मे रोजी पनवेल प्रांत कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलावीत, असे निवेदन यावेळी प्रांत अधिकारी मार्फत राज्य सरकारला देण्यात आले.
या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष सुनिल घरत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, समीर ठाकूर, विकास घरत, राजू सोनी, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, राजेश्री वावेकर, अनिता पाटील, प्रमिला पाटील, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, मोनिका महानवर, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, भाऊ भगत, माजी नगरसेविका नीता माळी, लीना पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
