नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदि मान्यवरांची उपस्थिती
पनवेल,दि.1 : पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन, विविध योजनांचे भूमीपूजन त्याबरोबरच इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा 3 जूनला सायंकाळी 5.30 वाजता आद्य क्रांतीवीर बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल राहणार असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री अदिती तटकरे, ,खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, उपमहापौर सिताताई पाटील, विराधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, सभागृह नेते परेश ठाकूर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!