पनवेल दि.१०: समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्व देणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात आवड आहे. मॅरेथॉन, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचे ते भव्य आणि उत्कृष्ट नियोजनात आयोजन करीत असतात. त्यांची क्रीडा विषयी आत्मीयता पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने ‘खेलो युवा- स्पोर्ट्स मुमेंट’ या शीर्षकाखाली फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल अशा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने १७ व १८ मे रोजी कामोठे येथे तालुकास्तरीय कबड्डी लीग, २० मे रोजी कळंबोली येथे जिल्हास्तरीय खो- खो, तसेच खारघर येथे व्हॉलीबॉल, २० व २१ मे रोजी पनवेल येथे फुटबॉल स्पर्धा अशा सर्व प्रकाशझोतात भव्य आयोजित करण्यात आली आहे.
फुटबॉल स्पर्धा पुरुष गटात होणार असून या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २५ हजार तर तृतीय क्रमांकास १० हजार रुपये, खो-खो स्पर्धा पुरुष व महिला या दोन गटात होणार असून प्रथम क्रमांकाला ०५ हजार रुपये, द्वितीय ०३ हजार, तृतीय ०२ हजार तर चतुर्थ क्रमांकास ०१ हजार रुपये, कबड्डी स्पर्धा पुरुष गटात होणार असून प्रथम क्रमांक २१ हजार १११ रुपये, द्वितीय ११ हजार १११ रुपये तर तृतीय क्रमांक ५५५५ रुपये, व्हॉलीबॉल स्पर्धा पुरुष गटात असून प्रथम क्रमांक २१ हजार १११ रुपये, द्वितीय ११ हजार १११ रुपये तर तृतीय क्रमांक ५५५५ रुपये तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.