पनवेल दि.30: कोरोना महामारीच्या काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार मार्च महिन्यापासून घरी बसले आहेत. सगळं काही सुरु आहे, मग काही नियम आणि अटी मध्ये कलाक्षेत्र का सुरु होऊ शकत नाही? त्यापार्श्वभुमीवर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्यावतीने आज पनवेलमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी संस्थेच्यावतीने तहसीलदार अमित सानप यांना निवेदन दिले. कोरोना महामारीच्या काळात सर्व कलाकार, लोककलावंत, तंत्रज्ञ, वाद्यवृंद, वाघ्यामुरळी, ब्रासबैण्ड, बेंजो, अशा सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकारांचा संयम तुटू लागला असून, कलाकारंमधील आक्रोश वाढत चालला आहे. म्हणुन रायगडमधील संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या वतीने पनवेल येथील तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आलअ होता. या वेळी त्यांनी कलाकारांच्या व्यथेला आपल्या कडून शासनदरबारी न्याय मिळवून देण्यास मदत कराल. तसेच आर्थिक सहायता मिळावी, तसेच छोट्या मोठ्या सभागृहा मध्ये सर्व नियम व अटी सांभाळून कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी. सर्व कलाकारानं कडून नम्र विनंती की आपल्या माध्यमातून शासनदरबारी आमची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्याल या आशयाचे निवेदन तहसीलदार अमित सानप यांना दिले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मुकेश उपाध्याय, उपाध्यक्ष प्रविण मोहोकर, गणेश गव्हाणकर, मीनल लिमये, वैभवी कदम, शाकम्बरी कीर्तिकर, विकि उपाध्याय, सुमेधा लिम्हण, गणेश भगत, उदय साटम, संतोष लिंबोरे, दीपक गायकवाड यांच्यासह रायगड आणि नवी मुंबई, परिसरातील, शेकडो कलाकार उपस्थित होते.