नवीमुंबई, दि.11 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार दिनांक. 26 जून 2024 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान होणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी श्रीमती. अंशु सिन्हा, भाप्रसे (एमएच:99) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती. सिन्हा यांचा दूरध्वनी क्रमांक 9920793676 असून त्यांचा ईमेल आयडी anshus72@yahoo.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय, पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत श्रीमती. सिन्हा यांच्यांशी संपर्क साधता येईल.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एन नवीन सोना, भाप्रसे (एमएच:2000) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोना यांचा दूरध्वनी क्रमांक 8591248668 असून त्यांचा ईमेल आयडी nawin.sona@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत सोना यांच्यांशी संपर्क साधता येईल.
मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर, भाप्रसे (एमएच:2007) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कल्याणकर यांचा दूरध्वनी क्रमांक 9324565110 असून त्यांचा ईमेल आयडी mahendrakalyankar@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत डॉ. कल्याणकर यांच्यांशी संपर्क साधता येईल.